Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचं 84 टक्के काम पूर्ण

mumbai trans harbour link
, गुरूवार, 15 सप्टेंबर 2022 (09:34 IST)
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम 84 टक्के पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी डिसेंबरपूर्वी हा प्रकल्प पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
 
शिवडी येथून सुरू होणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या कामाची पाहणी बुधवारी (14 सप्टेंबर) मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी ते बोलत होते.
 
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, "मुंबईला रायगड जिल्ह्याशी थेट जोडणारा हा 22 किमी लांबीचा देशातील सर्वाधिक मोठा पहिला सागरी सेतूमार्ग आहे. या सागरी सेतूवरून दिवसाला किमान एक लाख वाहनांची ये-जा करण्याची क्षमता असून नागरिकांच्या वेळेची तसेच इंधनाची मोठी बचत होईल."
 
"आगामी काळात लॉजिस्टिक्स पार्क, टाऊनशिप आणि रोजगार निर्मिती या तीन बाबींवर लक्ष केंद्रीत केले जाणार असून याद्वारे संबंधित परिसराचा सुनियोजितपणे विकास होईल." ही बातमी लोकसत्ताने दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या दोन दिवशी होणार महारोजगार मेळावा; मिळणार जागेवरच पक्की नोकरी