Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चाकूचा धाक दाखवून १५ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार! मुंबईतील घटना..

rape
, गुरूवार, 28 सप्टेंबर 2023 (07:39 IST)
मुंबई :मुंबईतील  मुलुंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चाकूचा धाक दाखवून १५ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी एका २१ वर्षीय तरूण आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिस अधिक तपास करत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधान संहिता कलम आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
 
याबाबत सविस्तर..
मुलुंड येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. चाकूचा धाक दाखवून तसेच आईला जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. मुलुंड पोलिसांनी सामुहिक बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी २१ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या आरोपीच्या शोधात पोलिसांचे पथक परराज्यात रवाना झाले आहे. गुंगीच औषध देऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे एफआयआरमध्ये नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या अँगलने तपास सुरू केला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ind vs Aus: वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाचा मोठा पराभव