Publish Date: Wed, 04 Feb 2026 (13:19 IST)
Updated Date: Wed, 04 Feb 2026 (13:29 IST)
आयआयटी बॉम्बेमधील एका बी.टेकच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. राजस्थानमधील नमन अग्रवालने हॉस्टेलच्या छतावरून उडी मारली.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आयआयटी बॉम्बेमधून अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने संपूर्ण कॅम्पस शोकाकुल झाला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.
मृत विद्यार्थ्याचे नाव नमन अग्रवाल असे आहे. नमन २१ वर्षांचा होता आणि आयआयटी बॉम्बेमध्ये दुसऱ्या वर्षाचा बी.टेक सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. तो मूळचा राजस्थानमधील पिलानी येथील रहिवासी होता आणि शिक्षणासाठी मुंबईत आला होता. वृत्तानुसार, ही घटना पवई येथील आयआयटी बॉम्बे कॅम्पसमध्ये घडली. नमनने हॉस्टेल क्रमांक ४ च्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच उपस्थित असलेल्यांनी तात्काळ पोलिस आणि आयआयटी प्रशासनाला माहिती दिली. पवई पोलिस घटनास्थळी पोहोचले. विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Edited By- Dhanashri Naik