ठाण्यातील उल्हासनगर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या विरोधात महिला लिपिकाशी लैंगिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर मध्ये मध्यवर्ती पोलीस ठाण्यात एका 42 वर्षीय महिलेने महापालिकांच्या अतिरिक्त आयुक्तांवर महिलेकडून शारीरिक सुखाची मागणी करत महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली आहे.
महिलेचा पतीचे 2010 मध्ये आजाराने निधन झाले. महिलेला पतीच्या जागेवर नौकरी मिळाली आणि तिने कनिष्ठ लिपिक म्हणून पदभार सांभाळले.अधीकारी महिलेला त्यांच्या दालनात कामानिमित्त बोलवायचा आणि अश्लीलचाळे करायचा तसेच तिच्याकडून लैंगिक सुखाची मागणी वारंवार करायचा
हा सर्व प्रकार वर्षभर घडत होता. अखेर पीडित महिलेने 20 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेत अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार केली.तक्रारीची दखल घेत महापालिका प्रशासनाने विशाखा समिती गठीत करून चौकशी केली आणि अहवाल महापालिका आयुक्तांकडे दिला.
महिलेने या प्रकरणाची तक्रार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिली नंतर पोलिसांनी अधिकाऱ्याच्या विरोधात भादंवि कलम 354,354 (ए) 509 च्या अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस प्रकरणाची पुढील चौकशी करत आहे.