अभिनेत्री दिपाली सय्यद हिच्यावर ओशिवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप ठेऊन हा गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसापुर्वी आपल्या ट्विटर हँडलवर भाजपवर टिका करताना त्यांनी पंतप्रधानासाठी विवादित शब्द वापरल्याने त्यांच्यविरूद्ध ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर अभिनेत्री दिपाली सय्यद या आपल्या राजकिय व्यक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. सोशलमिडीयावर सक्रीय असलेल्या सय्यद य़ांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन भाजपवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेद्र मोदींवर थेट टिका करताना दिपाली सय्यद यांनी काही शब्दाचा वापर केला. त्यांचे हे ट्विट सोशल मिडियावर खुपच व्हायरल झाले होते. त्यांनी केलेले विधान आणि वापरलेले शब्द आक्षेपार्ह असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला.
“किरिट सोमय्याने आरोप केल्यानंतर मंत्री भाजपमध्ये जाऊन पवित्र होतात. मग पंतप्रधान त्यांना पाठिंबा देतात. त्यांच्या घोटाळ्याबाबत नंतर कुणीच काही बोलत नाहीत.” असे बोलून त्यांनी पंतप्रधानांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरला. दिपाली सय्यद त्यांच्या या विधानावरून अडचणीत आल्या आहेत. पंतप्रधानांसाठी आक्षेपार्ह विधान केल्याच्या एका तक्रारीवरुन त्यांच्यावर ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.