मुंबईच्या भेंडी बाजारातील एका व्यावसायिकाने कर्जाला कंटाळून स्वतःच्या कार्यालयात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पावणे आठच्या सुमारास घडली.
व्यावसायिकाने आत्महत्या केली तेव्हा कार्यालयात इतर कर्मचारी देखील होते. इकबाल मोहम्मद असे मयत व्यावसायिकाचे नाव असून त्यांच्यावर कर्ज होते. व्यवसायात देखील तोटा होत होता.कर्ज जास्त होत असल्याने त्यांनी कार्यालयात स्वतःच्या पिस्तुलने गोळी झाडून आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले. कर्जबाजारामुळे त्याने असे टोकाचे पाऊल घेतले कि अजून काही कारण आहे. ह्याचा तपास पोलीस करत आहे. पोलिसांनी शस्त्र जप्त केले आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद एडीआर अंतर्गत केली आहे.