ठाणे जिल्ह्यातील एका बांधकामाच्या ठिकाणी सिमेंटच्या विटा पडल्याने एका 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली.पोलिसांनी सांगितले की,वसंत कुशाभा साठे हे ट्रकमध्ये सिमेंट विटा देण्यासाठी बांधकाम साईटवर आले असताना शनिवारी अंबरनाथ परिसरातील औद्योगिक परिसरात ही घटना घडली.
अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, तो माल उतरवण्यासाठी ट्रकमधून खाली उतरताच बांधकामाच्या ठिकाणी बसवलेल्या लिफ्टमधून काही विटा त्याच्या अंगावर पडल्या, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविले आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.