मुंबईचा महत्वाचा घटक म्हणजे मुंबईची लोकल ट्रेन. सीएसएमटी वर रुळावरून लोकल ट्रेन उतरल्याची घटना घडली आहे. ज्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली आहे लोकल रुळावरून उतरल्यानंतर हार्बर लाईन वर इतर रेल्वेचे परिचालन थांबवावे लागले. रेल्वे अधिकारी लवकरच हे सर्व सुरळीत होईल असे सांगत आहे. आजून हे समजले नाही की कशामुळे रेल्वे रुळावरून खाली उतरली.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी एक लोकल ट्रेनचे डिरेल झाल्यामुळे हार्बर लाईन वर परिचालन पूर्ण पणे ठप्प झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेचे एक प्रवक्ता म्हणाले की, हार्बर लाईनवर लोकल ट्रेनचा एक डब्बा सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर रुळावरून खाली उतरला. या अपघातात एकपण प्रवाश्याला दुखापत झाली नाही.
अधिकारींनी सांगितले की, पनवेल पासून सीएसएमटी जाणारी लोकल ट्रेनचा एक डब्बा सकाळी प्लँटफॉर्म 2 येताच रुळावरून खाली उतरली. तसेच ते म्हणाले की कोणत्याच प्रवाश्याला दुखापत झाली नाही. लवकरच हे सुरळीत करू सांगितले.
Edited By- Dhanashri Naik