Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

नवी मुंबईत महिला प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी लोको पायलटने लोकल ट्रेन मागे वळवली

A loco pilot diverted a local train
, सोमवार, 8 जुलै 2024 (17:01 IST)
मुंबईत एका महिलेचा जीव वाचवण्यासाठी लोकल ट्रेनला मागे वळवले . या अपघातात महिलेच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. 

सदर घटना मुंबईच्या बेलापूर स्थानकावरची आहे.ट्रेनची वाट बघत असलेली 50 वर्षीय महिला पाय घसरून रुळावर पडली. दरम्यान रेल्वेचा पहिला महिला डबा तिच्यावरून गेला आणि हे पाहता प्रवासी आणि रेल्वे प्रशासना मध्ये घबराहट उडाली. नंतर लोको पायलटने महिलेचा जीव वाचवण्यासाठी लोकल ट्रेन चक्क  मागे नेली आणि महिलेचा जीव वाचवला. मात्र या अपघातात महिलेला दोन्ही पाय गमवावे लागले. महिलेला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. 

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले ट्रेन जवळून गेल्यामुळे महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली.मुंबईत सध्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले असून मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेवर त्याचा परिणाम झाला आहे. सर्वच गाड्या उशिराने धावत आहे. रुळांवर पाणी साचल्यामुळे वडाळा- मानखुर्द स्थानकादरम्यान हरबर मार्गावरील सेवा तात्पुरती बंद केली. 
 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदींच्या रशिया दौऱ्याकडे जग कसं पाहतं? मोदी-पुतिन भेटीत नेमकं काय होणार?