Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एक टीम गँगस्टर रवी पुजारीला ९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी

एक टीम गँगस्टर रवी पुजारीला ९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी
, मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (16:05 IST)
मुंबई पोलिसांची एक टीम गँगस्टर रवी पुजारीला बंगळुरूवरून घेऊन मुंबईत दाखल झाली आहे. मुंबई गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ही माहिती दिली आहे. रवी पुजारीला मुंबई सत्र न्यायालयासमोर गजाली रेस्टॉरंटमधील गोळीबार प्रकरणी हजर करण्यात आलं. आता त्याला ९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
गँगस्टर रवी पुजारीवर खून आणि खंडणीसह गंभीर गुन्हे केल्याचा आरोप आहे. २२ फेब्रुवारी रोजी त्याचे सेनेगल येथून प्रत्यार्पण करण्यात आले.
 
कर्नाटकमधील एका न्यायालयाच्या मंजुरीनंतर मुंबई पोलिसांची एक टीम गँगस्टर रवी पुजाराला ताब्यात घेण्यासाठी सोमवारी बंगळुरुमध्ये पोहचली होती. त्याला कर्नाटकमधील एका तुरूंगात ठेवण्यात आलं होतं. या अगोदर तो अनेक वर्षांपासून फरार होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करत 'रोजगार दो' हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये का आहे?