Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमिर खान करोना पॉझिटिव्ह; उद्धव ठाकरेंसोबत लावली होती कार्यक्रमाला हजेरी

Aamir Khan Corona Positive
, बुधवार, 24 मार्च 2021 (16:23 IST)
बॉलिवूड अभिनेता आमिर खानला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आमिर खान क्वारंटाइन झाला असून, त्याच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आमिर खानने दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ‘वर्षा’वरील कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासात करोनाचा शिरकाव झाला असून, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही करोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सध्या उपचार घेत असून, असं असतानाच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यासोबत एका कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या आमिर खानलाही करोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. आमिर खानच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. “आमिर खानला करोनाचा संसर्ग झाला आहे. तो आता होम क्वारंटाइनमध्ये असून, त्याची प्रकृती उत्तम आहे. तसेच सर्व नियमांचं पालन करत आहे. आमिर खानच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी करून घ्यावी,” असं आमिरच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.
 
जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा गौरव सोहळा मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झाला होता. हा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला होता. यावेळी आमिर खान आणि उद्धव ठाकरे शेजारीच बसलेले होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, आमिर खानची पत्नी किरण राव आदी उपस्थित होते. त्यामुळे आता आमिरच्या संपर्कात आलेल्या सर्वांबरोबरच कदाचित मुख्यमंत्र्यांनाही करोना चाचणी करावी लागू शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

“लवंगी फटाका की, बाॅम्ब लवकरच स्पष्ट होईल”; देवेंद्र फडणवीसांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर