मुंबईतील गोरेगाव मध्ये एका 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विनयभंग करणाऱ्या ओलाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
मुरारी कुमार सिंह असे या ओलाचालक आरोपीचे नाव असून तो मूळचा बिहारचा असून गोरेगावात राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 मे रोजी एका ओला कॅब चालकाने एका 15 वर्षीय मुलीचा अश्लील हावभाव करत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी आरे पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले असून त्याला पोलिसांनी अटक केले असून त्याला 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.