राजकीय पक्षांनी पुढील वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरु करण्याच्या बातम्या येत आहे.2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली होण्याचे समजत आहे.
युवासेनेचे प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण आणि उपनगरीय पालकमंत्री सध्या विविध वार्डामधील प्रश्न आणि नगरसेवकांच्या बैठका घेण्यासह मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित प्रकल्पांकडे जातीने लक्ष देत आहे. त्या मुळे ज्या प्रमाणे 1997 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईच्या महापालिका निवडणुकीची सूत्रे वर्तमान मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांना सोपविल्या होत्या त्याच प्रमाणे यंदाच्या महापालिका निवडणुकीचे सूत्र आदित्य ठाकरे यांच्या हाती असल्याने त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
त्यावेळी बाळासाहेब हे निवडणुकीचे प्रमुख जरी होते परंतु सर्व रणनीतीची आखणी उद्धव ठाकरे यांनी केलीच होती.यंदाच्या निवडणुकीचे नेतृत्व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे जे स्वतः युवा आणि तरुण असल्यामुळे त्यांच्या पक्षात नवीन तरुणांना संधी मिळणार का ?अशी चर्चा होत आहे.त्यामुळे यंदाच्या महापालिकाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहेत.