Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

12 वीच्या परीक्षेसाठी उद्यापासून अर्ज सुरू

12 वीच्या परीक्षेसाठी उद्यापासून अर्ज सुरू
मुंबई , गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (21:03 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२२ मध्ये घेण्यात येणार्‍या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता १२ वीच्या परीक्षेचे अर्ज १२ नोव्हेंबरपासून ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज भरावीत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सदर परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. 
 
यामध्ये उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत भरावयाची आहेत. तर, उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे शुक्रवार 3 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत. 
 
विलंब शुल्कासह हे अर्ज 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येतील. तर, उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी 12 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2021 असा आहे.  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोवॅक्सीन घेणारे भारतीय कोणत्याही निर्बंधाशिवाय ब्रिटनमध्ये जाऊ शकतील, 22 नोव्हेंबरला ब्रिटीश सरकार मान्यता देईल