Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळा संपन्न

बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळा संपन्न
, बुधवार, 31 मार्च 2021 (22:37 IST)
मुंबईच्या शिवाजी पार्कमधील जुन्या महापौर निवासस्थानाची स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या सोहळा संपन्न झाला. संध्याकाळी ५.३० वाजता हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीतले तीन प्रमुख नेते उपस्थित होते.
या सोहळ्यामध्ये सुरुवातीला बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा विधी पार पडला. त्यानंतर त्यांच्या हस्ते स्मारकाच्या आवारातच वृक्षारोपण केलं गेलं. त्यानंतर महाविकास आघाडीतील दुसरा प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. आणि  काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देखील वृक्षारोपण करण्यात आलं. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिनही प्रमुख पक्षांच्या राज्यातील प्रमुख नेत्यांचा या सोहळ्यामध्ये सहभाग होता.
 
दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक हा सरकारी कार्यक्रम असल्यामुळे या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील निमंत्रित केलं जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, तसं झालं नाही. त्यामुळे भाजपाच्या नेतेमंडळींकडून त्यावर तीव्र शब्दांमध्ये टीका केली गेली. नितेश राणे यांनी देखील “आज बाळासाहेब असते तर पहिलं निमंत्रण देवेंद्र फडणवीसांना दिलं असतं. मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं,”, असं म्हणत निशाणा साधला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चिपी विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित करा – मुख्यमंत्री