Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

न्यू ईयर सेलिब्रेशनवर बंदी?

न्यू ईयर सेलिब्रेशनवर बंदी?
मुंबई , मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (19:25 IST)
देशात Omicron चे रुग्ण वाढले, असून अनेक राज्यात ख्रिसमन आणि न्यू ईयर सेलिब्रेशनवर बंदी घालण्यात आली आहे. देशभरात आतापर्यंत एकूण 200 ओमायक्रॉनची रुग्ण (Omicron cases) आढळून आली आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
 
ओमायक्रॉनच्या धोक्यात अनेक राज्यांनी ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षाच्या पार्ट्या (New Year celebration) टाळण्यास सांगितले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सांगितले की, आम्ही नवीन वर्षाच्या सार्वजनिक उत्सवावर बंदी घातली आहे. तसेच 50 टक्के आसन क्षमता असलेल्या क्लब आणि रेस्टॉरंटमध्ये डीजेसारख्या विशेष कार्यक्रमांशिवाय मेळाव्यास परवानगी आहे. या काळात संपूर्ण लसीकरण अनिवार्य आहे. हे निर्बंध 30 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत लागू असतील.
 
ओमायक्रॉन प्रकाराची वाढती प्रकरणे लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) लोकांना ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्टीत जाणे टाळण्यास सांगितले आहे. तसेच, महाराष्ट्र सरकारने 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मुंबईत कलम 144 लागू केले आहे. या दरम्यान, नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी समुद्रकिना-यावर किंवा पर्यटन स्थळांवर पार्ट्यांना परवानगी दिली जाणार नाही. उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल. ओमायक्रॉनच्या आतापर्यंत नोंदवलेल्या सर्व प्रकरणांपैकी सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Google ने जाहीर केली सर्च ईयर ऑफ 2021 ची यादी, जाणून घ्या इंटरनेटवर भारतीय लोकांना सर्वाधिक काय शोधलं