मुंबई : मुंबई विमानतळावरून पोलिसांनी एका बांगलादेशी तरुणाला अटक केली आहे. तसेच आरोपी काझी बनावट कागदपत्राच्या मदतीने परदेशात जात होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सोमवारी मुंबई विमानतळावरून एका व्यक्तीला अटक केली. मोहम्मद उस्मान करमत अली बिस्वास असे आरोपीचे नाव आहे. तो 2012 पासून भारतात राहत होता. व 11 ऑगस्ट रोजी बनावट कागदपत्रांच्या मदतीने सौदीला जाणार होता, असे पोलिसांनी सांगितले.
याआधीही त्याने 2016 आणि 2023 मध्ये प्रवास केला होता. पोलिसांनी आरोपींकडून मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट आणि इतर बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने तो अवैधरित्या भारतात आल्याचे सांगितले. वयाच्या 13 व्या वर्षी कोलकात्यात तो आणि नंतर पुण्यात आला. तिथे काम करत असताना त्याची कागदपत्रे बनवली.
Edited By- Dhanashri Naik