Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Income Tax Mumbai Bharti 2024 : 10वी/12वी उत्तीर्णांसाठी मुंबईत केंद्रीय नोकरीची मोठी संधी; ताबडतोब करा अर्ज

income tax building
, गुरूवार, 11 जानेवारी 2024 (08:52 IST)
Income Tax Mumbai Bharti 2024 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना खुशखबर आहे. मुंबई आयकर विभागात विविध पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीची जाहिरात देखील प्रसिद्ध झालेली आहे. या भरतीद्वारे एकूण 291 जागा भरल्या जाणार आहे. दहावी ते पदवीधरांना नोकरी मिळविण्याची ही मोठी संधी ठरू शकते.
 
ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी आयकर विभागाच्या वेबसाईट incometaxmumbai.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
 
पदाचे नाव आणि पदसंख्या
1) इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स (ITI) 14
2) स्टेनोग्राफर 18
3) टॅक्स असिस्टंट (TA) 119
4) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 137
5) कॅन्टीन अटेंडंट 03
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
क्रीडा पात्रता: राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)
 
वयोमर्यादा : 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [OBC: 05 वर्षे सूट, SC/ST: 10 वर्षे सूट]
परीक्षा फी : ₹200/-
इतका पगार मिळेल :
इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स (ITI) – 44,900/- ते 1,42,400/-
स्टेनोग्राफर – 25,500/- ते 81,100/-
टॅक्स असिस्टंट (TA) – 25,500/- ते 81,100/-
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 18,000/- ते 56,900/-
कॅन्टीन अटेंडंट-18,000/- ते 56,900/-

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनमाडमधील पेट्रोल-डिझेल टँकर चालक पुन्हा संपावर ! पुन्हा इंधन टंचाईची शक्यता