सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. नवाब मलिक यांचा अटकेनंतर भाजप आणि शिवसेनेचा वाद विकोपाला गेला आहे. राज्यात कल्याण डोंबिवलीत भाजप- शिवसेना वाद चांगलेच विकोपाला गेले आहे. सध्या पालक मंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी असल्याचा आरोप करत शिंदे यांचा विरोधात डोंबिवलीत बॅनर लावले होते. आज त्याला प्रत्युत्तर देत शिवसेनाने देखील भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांचा विरोधात बॅनर लावल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 3 वेळा आमदार तीन वर्ष मंत्री असून लोकप्रतिनिधीच विकासाचा खरा मारेकरी. डोंबिवलीसाठी काय केलं ते सांगा.आणि सोबत गाजराचा फोटो देखील दाखवला आहे.
काही वेळातच हे बॅनर केडीएमसी ने पोलिसांच्या मदतीने काढले. या बॅनर च्या एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे त्यावर 2 वर्षाच्या काळात 1690 कोटीचे प्रकल्प मार्गी लावलेले दाखवून कामाची यादी टाकण्यात आली आहे. तर दुसरी कडे निष्क्रिय लोकप्रतिनिधीच विकासाचा खरा मारेकरी असून गाजराचा फोटो लावला आहे.
भाजपच्या आमदार रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे हे डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी असल्याचा आरोप केला होता. नंतर याचे बॅनर लावण्यात आले होते. त्याला प्रत्युत्तर देत आता शिवसेनेने बॅनर लावले आहे.