Publish Date: Sat, 27 Mar 2021 (16:45 IST)
Updated Date: Sat, 27 Mar 2021 (16:47 IST)
मुंबईत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी BMC प्रशासनाने कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णांना आळा घालण्यासाठी महापालिकेने खासगी कार्यालयांवर निर्बंध लादले आहेत. खासगी कार्यालयांमधील गर्दी 50 टक्के इतकी झाल्यास लोकल ट्रेनमधील गर्दी कमी होण्यास मदत होईल, असा कयास आहे.
मुंबईतील खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थितीचे आदेश आधीच देण्यात आले आहेत. आता महापालिका या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागात पाच पथकं तैनात करणार आहे. ही पथकं खासगी कार्यालयावर नजर ठेवतील.