Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 27 April 2025
webdunia

बीएमसी प्रशासनाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत संयुक्तपणे ठोस पावले उचलली

मुंबईत बीएमसीची कारवाई
, मंगळवार, 31 डिसेंबर 2024 (10:53 IST)
Mumbai News : प्रदूषण रोखण्यासाठी बीएमसी प्रशासनाने ठोस पावले उचलली आहे. 77 बेकरी बंद करण्याची आणि 41 स्मशानभूमींना पीएनजी आणि विजेमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रस्त्यांवरील धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहे.
 
मिळालेल्या माहितनुसार प्रदूषण रोखण्यासाठी बीएमसी प्रशासनाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत संयुक्तपणे ठोस पावले उचलली आहे. सोमवारी बीएमसी मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त भूषण गगराणी म्हणाले की, प्रदूषण पसरवल्याप्रकरणी कोळसा आणि लाकडावर चालणाऱ्या 77 बेकरी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच, 41 लाकूड आधारित स्मशानभूमी पीएनजी आणि विजेमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. मुंबईतील 225 स्मशानभूमींचे वीज आणि पीएनजीमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रियाही सुरू आहे.
 
सार्वजनिक वाहतूक सेवा पर्यावरणपूरक बनवण्यासाठी 2100 सिंगल डेकर आणि 200 डबल डेकर इलेक्ट्रिक बसेसचा लवकरच बेस्टच्या ताफ्यात समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यासाठी एमएमआर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पालघर, कल्याण आणि भिवंडी येथे विविध ठिकाणी एकूण 45 हवेच्या गुणवत्तेची देखरेख यंत्रे बसवण्यात आली आहे .  

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केरळला 'मिनी पाकिस्तान' म्हणाले, नितीश राणेंना काँग्रेसने अपात्र करण्याची मागणी केली