Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईच्या टाइम्स टॉवर इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईच्या टाइम्स टॉवर इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल
, शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (10:25 IST)
मुंबईतील लोअर परेल पश्चिम भागात असलेल्या टाइम्स टॉवर इमारतीला भीषण आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कमला मिलमध्ये ही इमारत आहे. तसेच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने या घटनेला दुजोरा दिला आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. टाइम्स टॉवर मुंबईतील अतिशय वर्दळीच्या भागात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार बृहन्मुंबई पालिका म्हणजेच BMC ने या घटनेबाबत अपडेट जारी केले आहे. मुंबईच्या लोअर परेल पश्चिम भागात असलेल्या टाइम्स टॉवर इमारतीला आग लागल्याचे बीएमसीने म्हटले आहे. अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी हजर आहेत. सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आग विझवण्याचे काम सुरू आहे.
 
टाईम्स टॉवर ही मुंबईतील परळ पश्चिम येथील बहुमजली व्यावसायिक इमारत आहे. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, लोअर परळच्या कमला मिल कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या टाइम्स टॉवरमध्ये सकाळी 6.30 च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाने या आगीचे वर्णन लेव्हल 2 म्हणजेच मोठी आग असल्याचे सांगितले आहे. अद्याप कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही मात्र घटनास्थळी रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धर्मनगरी उज्जेनमध्ये रस्त्याच्या कडेला महिलेला दारू पाजून लैंगिक अत्याचार