Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 124 कोकेन कॅप्सूल गिळलेल्या ब्राझीलच्या महिलेला अटक

arrest
, सोमवार, 23 सप्टेंबर 2024 (14:41 IST)
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका ब्राझिलियन महिलेला डीआरआय ने अटक केली आहे. तिच्या कडून 124 कोकेनचे केप्सुल जप्त करण्यात आले आहे. हे कॅपस्यूल या महिलेने गिळले होते. याची किंमत 9.73  कोटी रुपये आहे अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. भारतात बंदी असलेले अमली पदार्थ तस्करीसाठी आणले जात होते. 

डीआरआयच्या मुंबईतील झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी साओ पाउलो उतरल्यावर एका विशेष इनपुटवर महिलेला थांबविले.

चौकशीत महिलेने 124 कोकोचे कॅपस्यूल गिळले असून ते भारतात तस्करी करण्यासाठी आणले होते. महिलेला अटक केल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

रुग्णालयात डॉक्टरांनी तिच्या शरीरातून 973 ग्राम कोकेन असलेल्या 124 कॅपस्यूल काढल्या आहे. याची किंमत 9.73  कोटी रुपये आहे. हे अमली पदार्थ नार्कोटिक्स ड्रुग्स अँड सायकॅट्रॉपिक्स सबस्टेन्टन्सन्स कायद्यानुसार जप्त केल्या आहे. महिलेला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माकडांनी 6 वर्षाच्या चिमुकलीला बलात्कारापासून वाचवले ! बागपतमध्ये घडला हा 'चमत्कार'