Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उद्यापासून मुंबईत फटाके फोडण्यावर आणि रॉकेट फोडण्यावर बंदी

maharashtra police
, शनिवार, 10 मे 2025 (18:47 IST)
भारत आणि पाकिस्तान तणावाच्या दरम्यान, मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.  उद्यापासून मुंबईत फटाके फोडण्यावर आणि रॉकेट सोडण्यावर बंदी आहे. सीमेवरील वाढता तणाव आणि भारत-पाकिस्तान तणाव लक्षात घेता मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. 11 मे ते 9 जून पर्यंत फटाके फोडण्यास बंदी आहे. आदेशाचे पालन न केल्यास कारवाई केली जाईल.
भारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या संघर्षामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भारत आणि पाकिस्तान एकमेकांवर हल्ले करत आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांमुळे भारताचे काही जवान शहीद झाले आहे. दोन्ही कडून ड्रोन हल्ले सुरु आहे. या संघर्षाच्या स्थितीत मुंबई पोलिसांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 
ALSO READ: मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात आता नारळ, हार आणि प्रसादवर बंदी
भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षावर मुंबई पोलीस सक्रिय मोड आहे. मुंबई पोलिसांनी शनिवारी महत्त्वाचा आदेश काढला आहे. मुंबई पोलिसांनी उद्या 11 मे पासून 1 जून पर्यंत फटाके आणि रॉकेट फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचा उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार आहे. 
ALSO READ: मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याची न्यायालयीन कोठडी 6 जूनपर्यंत वाढवली
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 व्या कलम 10 मधील पोटकलम 2 सह कलम 33 च्या पोटकलम 1 च्या खंडनुसार मुंबई पोलिसांनी शहरात फटाके, रॉकेट उडवण्यावर बंदी घातली आहे. या आदेशाची माहिती पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी, लाऊडस्पीकर, मेगाफोनवरून दिली जाणार आहे.  
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाडीत भटक्या कुत्र्यांचा6 वर्षांच्या निष्पाप मुलावर प्राणघातक हल्ला