Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई: सुरेश रैनासह 34 सेलिब्रेटींना नाइट कर्फ्यूमध्ये पार्टी केल्याप्रकरणी अटक, 34 जणांविरोधात खटला

webdunia
मंगळवार, 22 डिसेंबर 2020 (16:50 IST)
सहा महिन्यांनंतर मंगळवारी देशात कोरोनाव्हायरसच्या 20 हजाराहून कमी नवीन प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. तथापि, मुंबईसह काही शहरांमध्ये कोरोना संसर्गाची तीव्रता अजूनही कायम आहे. 22 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान मुंबईत (Mumbai Night Curfew) नाइट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई विमानतळाजवळील मुंबई पबमध्ये मुंबई पोलिसांनी छापा टाकला आहे. यावेळी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या नियमांचे आणि रात्रीच्या कर्फ्यूचे उल्लंघन केल्याबद्दल 34 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या 34 लोकांपैकी बरेच जण सेलिब्रेटी आहेत. त्यापैकी क्रिकेटपटू सुरेश रैना असे नाव आहे. सर्वांना अटक करण्यात आली. मात्र नंतर त्यांना जामीन मिळाली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार कोविड आणि लॉकडाऊनच्या नियमांनुसार मुंबईत पब उघडे ठेवण्यासाठी जास्तीत जास्त वेळ रात्री 11 वाजता ठेवण्यात आला आहे. पण पब पहाटे 4 पर्यंत चालू होता. तिथे पार्टी सुरू होती. अशा परिस्थितीत पोलिसांनी येथे छापा टाकला असून सर्व 34 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 
 
या 34 लोकांपैकी 27 पबचे कस्टमर आहे. तसेच 7 लोक कर्मचारी आहेत. रात्री अडीचच्या सुमारास पोलिसांनी पबवर छापा टाकला. रिपोर्ट्सनुसार क्रिकेटर सुरेश रैना, गायक गुरु रंधावा आणि इतर अनेक सेलिब्रिटी पार्टीत उपस्थित होते. 
 
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पबमध्ये पोलिसांच्या छापाच्या वेळी अनेक सेलिब्रिटीज मागच्या दाराने पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. दिल्लीहून पार्टीतले 19 लोक मुंबईत आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना व्हायरस : लंडनहून आलेले 6 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, सरकारने जारी केले नवे नियम