Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केंद्र सरकार महापालिकेला लस न देता खासगी क्षेत्राला देत आहे : पेडणेकर

केंद्र सरकार महापालिकेला लस न देता खासगी क्षेत्राला देत आहे : पेडणेकर
, बुधवार, 2 जून 2021 (16:32 IST)
“केंद्राने आम्हाला लस पुरवावी, आम्ही लोकांना मोफत देतो. पण, केंद्र सरकार महापालिकेला न देता खासगी क्षेत्राला देत आहेत. त्यामुळे कुणी एक हजार रुपयाला, कुणी १२००, तर कुणी १८०० लस विकत आहेत. गरीब-श्रीमंत भेदभाव न करता सगळ्या मुंबईकरांना लस देतोय. लशींसाठी केंद्राला पैसे द्यायला तयार आहोत, मुख्यमंत्र्यांनीही १२ कोटी एकरकमी देण्याची तयारी दाखवली आहे. पण काय होतंय हेच कळत नाही. सगळा संभ्रम आहे. महापालिकेला ज्यावेळीही लस मिळाली, सगळी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली. लोकांना मोफत लस दिली गेली,” अशी माहिती मुंबईच्या महापौर पेडणेकर यांनी दिली.
 
महापौर पेडणेकर म्हणाल्या,”मला अशी माहिती मिळाली आहे की, खासगी रुग्णालये केंद्राकडून विकत घेऊन लसीकरण करत आहेत. त्यांच्याकडून लस घेण्यासाठी नागरिकांना पैसे द्यावे लागत आहेत. महापालिकेकडे तसं नाही. महापालिका लोकांना मोफत लस देत आहे आणि मोफतच देणार. आम्ही केंद्राला लशींसाठी पैसे द्यायला तयार आहोत, पण तो पुरवठा महापालिकेला मिळत नाही. केंद्राकडून ज्याप्रमाणे खासगी क्षेत्राला लस पुरवली जात आहे, त्याचप्रमाणे त्याच किमतीत आम्हाला लस द्यावी. राज्य सरकार, महानगरपालिका पैसे देऊन लस खरेदीसाठी तयार आहे,” असं महापौर पेडणेकर म्हणाल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काश्मिरच्या लहान मुलीचा व्हीडिओ व्हायरल, शाळेतल्या होमवर्कविरोधात थेट पंतप्रधानांनाच तक्रार