Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतुक कोलमडली आहे

webdunia
, शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (08:00 IST)
संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतुक कोलमडली आहे. लोहमार्ग पोलिस नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार कळवा आणि मुंब्रा दरम्यान जलद मार्गावर पाणी साचलेल्याने त्या मार्गावरील लोकल वाहतुक ठप्प आहे. तर धीम्या मार्गावरही लोकल वाहतुक रखडली आहे. ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅकवर काही ठिकाणी पाणी साचले आहे.
 
गणपतीच्या काळात नेहमीपेक्षा जरा गर्दी कमी असली तरी ही कार्यालयहून परतण्याची वेळ असल्याने आणि त्यात लोकल सेवा रखडल्याने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे हाल झाले आहेत.
 
वेळापत्रक कोलमडल्याने कल्याणच्या पुढे कर्जत-कसारा लोकल वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. नेहमीप्रमाणे लोकल ट्रेनमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर उद्घोषणेचा अभाव असल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. हार्बर, ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतुक काहीशा उशीराने पण सुरळीत सुरु आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

याकूब मेमनची कबर सजवत बसले आणि आता म्हणे माझ्या बापाच्या नावाने मतं मागू नका