Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवासस्थानी गणपतीची पूजा केली, जनतेला शुभेच्छा दिल्या

eknath shinde
, शनिवार, 7 सप्टेंबर 2024 (17:24 IST)
social media
आज गणेश चतुर्थीला घरोघरी बाप्पांचे आगमन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या निवासस्थानी गणपती बाप्पांची स्थापना केली. गणेश चतुर्थी निमित्त त्यांनी राज्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. आणि राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली. 

गणेश चतुर्थी निमित्त दर वर्षी प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे आगमन झाले. या वेळी त्यांची पत्नी, मुलगा खासदार डॉ. श्रीकांतशिंदे, सून नातू उपस्थित होते. त्यांनी राज्यातील जनतेला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आणि जनतेच्या सुख समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना केली. 
 
ते म्हणाले, राज्यातील जनतेच्या विकासासाठी राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले आहे. तरुणानं रोजगाराच्या संधी मिळणार आहे. महिला सक्षमीकरणासाठी योजना राबवल्या आहे. शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना मदत केली जाईल. 
गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घ्या. सामाजिक बांधिलकी ठेवू या गरजूंना मदत करा. गरजूवंतांपर्यंत शिक्षण, आरोग्य आणि विविध सेवा देण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चालत्या ट्रेनमध्ये एसी कोचच्या टॉयलेटमध्ये बलात्काराचा प्रयत्न, आरोपीला अटक