महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नवी वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या दोन्ही नेत्यांविरुद्ध मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यांच्यावर खोट्या बातम्या पसरवल्याचा आणि राज्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण 13 सप्टेंबर रोजी बेंगळुरूमध्ये विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या अनधिकृत निषेधाशी संबंधित आहे, ज्यामध्ये आंदोलकांनी गणेशाच्या मूर्तीसह भाग घेतला होता.
पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन मूर्ती सुरक्षित ठेवली व नंतर विधिवत पूजा करून मूर्तीचे विसर्जन केले. राजकीय फायद्यासाठी या घटनेचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. कर्नाटक सरकारने गणपती उत्सवावर बंदी घातली आणि मूर्ती जप्त केली, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले, ते चुकीचे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ही खोटी माहिती पसरवून कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर आरोप केले
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी पक्ष राजकीय फायद्यासाठी जाणीवपूर्वक खोट्या बातम्या आणि अफवा पसरवत असून त्यामुळे राज्यात धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. ही बाब गांभीर्याने घेत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अन्य आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने पोलिसांकडे केली आहे.
या प्रकरणी कोंग्रेसचे नेते नाना पाटोळे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सणासुदीच्या काळात खोट्या बातम्या पसरवत आहे. असं करून ते तेढ निर्माण करत आहे. भाजप आणि महायुती फेक नॅरेटिव्ह बनवत आहे. फेक न्यूज देऊन ते समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.