Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मासळी बाजारात करोना उपचार केंद्र

मासळी बाजारात करोना उपचार केंद्र
मुंबई , बुधवार, 21 एप्रिल 2021 (18:07 IST)
शहरातील प्राणवायूची गरज भागविण्यासाठी पालिकेतर्फे ७८ लाख रुपयांचा प्राणवायू निर्मिती प्रकल्प तयार केला जाणार आहे. याशिवाय नालासोपारा येथील मासळी बाजाराचे रूपांतर करोना उपचार केंद्रात केला जाणार असून तिथे दीडशे खाटांचे अतिदक्षता केंद्र उभारले जाणार आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी शहरातील करोनास्थितीचा आढावा घेतल्यानंतर ही माहिती दिली. भुसे यांनी सोमवारी पालघरसह वसई-विरार महापालिका क्षेत्राची पाहणी केली. त्यानंतर महापालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या वेळी त्यांनी कोरोना नियंत्रण आणि उपचारासाठी पालिका करत असलेल्या उपाययोजनांची माहिती देत अधिक सुविधा निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आता अधिक प्रखरतेने करोनाचा फैलाव होत आहे. जिल्ह्यााला ४० टन प्राणवायूची गरज लागू शकते, सध्या केवळ २० टन प्राणवायू पुरवठा होत आहे. यामुळे पुरवठा वाढविण्यासाठी पालिका आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. लवकरच हा पुरवठा वाढविला जाणार आहे. पालिकेने ७८ लाख रुपयांचा प्राणवायू निर्मिती केंद्र (ऑक्सिजन जनरेटर प्लांट) तयार करणार आहे. यात एका वेळी १२० प्राणवायूच्या टाक्या भरण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. सध्या सरकारी रुग्णालयांना प्राधान्याने आधी प्राणवायू दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
शहरात निर्माण झालेल्या करोना रुग्णांना खाटांचा मोठा तुटवडा निर्माण होत असल्याने पालिका नालासोपारा येथील मासळी बाजाराचे रूपांतर दीडशे बेडच्या अतिदक्षता रुग्णालयात करण्यात येणार असून हे काम पुढील १५ दिवसात केले जाईल, असेही ते म्हणाले. रुग्ण अलगीकरण-विलगीकरणासाठी म्हाडाच्या इमारती अधिग्रहित केल्या जाणार आहेत. रुग्णांचे अलगीकरण आणि विलगीकरण करण्यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक विभागात केंद्र उभारण्यात येणार आहेत. वसई-विरार महापालिकेनेही म्हाडाच्या इमारती अधिग्रहीत करून ५०० क्षमतेचे सीसीसी केंद्र उभारणी करण्याच्या कामाला सुरुवात झाली असल्याचेही ते म्हणाले. मध्यवर्ती नियोजनाप्रमाणे त्या-त्या रुग्णालयाला रेमडेसिविर उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र रेमडेसिविरचा तुटवडा भासत असल्याची वस्तुस्थिती भुसे यांनी या वेळी मान्य केली. येत्या काही दिवसांत त्याचाही पुरवठा सुरळीत होईल, अशी आशा व्यक्त केली. दरम्यान; सीटीस्कॅनबाबत नियमाप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश डॉक्टरांना दिले असून; काही रुग्णालयांत दिवसाचे २५०० तर रात्रीचे २००० रुपये चार्जेस आकारले जात आहेत; तिथे २००० रुपयेच आकारले जावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भायखळा कारागृहात कोरोनाचा कहर; इंद्राणी मुखर्जीसह ३८ महिला कैदी बाधित