वाशीमच्या मंगरूळपीर तालुक्याच्या निंबी गावात आरोग्यविभागाच्या हलगर्जीपणा मुळे एका दोन महिन्याच्या चिमुकलीचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चुकीचा पोलिओ डोस पाजल्यामुळे या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.असा आरोप मयत मुलीच्या पालकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कासोळा आरोग्यकेंद्रामार्फत निबी गावात मुलांचे पोलिओ डोस लसीकरण सुरु होते. त्यात या चिमुकलीला दिलेल्या पोलिओ डोस मुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप आणि तक्रार मुलीचे पालक केशव आडे यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, या मुलीला 8 फेब्रुवारी 2022रोजी पोलिओचा डोस दिला त्यानंतर मुलीच्या मेंदूने काम करणे बंद केले. तिला एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता तिथल्या डॉक्टरांनी तिला अकोल्याला नेण्याचा सल्ला दिला त्या मुलीचा डोक्यात ताप शिरल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
या बाबत आरोग्यविभागाने स्पष्टीकरण दिले आहे की , आम्ही शासनाने दिलेल्या आदेशानुसार लसीकरण करत आहोत.लसीकरण केल्याच्या 24 तासात त्याचे परिणाम जाणवतात. असे काहीच झाले नाही. पण त्या मुलीची प्रकृतीत दुसऱ्या दिवशी बिघाड झाल्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिओ डोस दिल्याने असे काही झालेलं नाही.