मुंबई महापालिकेतून विधान परिषदेत दोन सदस्यांच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. शिवसेना आणि भाजपकडून या जागांसाठी अर्ज भरण्यात आला आहे.परंतु अखेर काँग्रेसकडून सुरेश कोपरकर यांनी उमेदवारी अर्ज माघे घेतला असल्यामुळे मुंबई विधानपरिषदेच्या दोन जागांवर आता निवडणूक बिनविरोध होणार आहे.
मुंबई महापालिकेतून विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी शिवसेनेच्या सुनिल शिंदे यांनी तर भाजपकडून राजहंस सिंह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन जागांवर तिसरा उमेदवारी अर्ज काँग्रेसच्या सुरेश कोपरकर यांनी भरला होता. यामुळे ही निवडणूक होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपकडून विधानपरिषदेसाठी अमराठी उमेदवार दिला आहे. तर काँग्रेसकडून मराठी उमेदवार देण्यात आला होता. तसेच मराठी उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची भूमिका काँग्रेसने घेतली होती. असे असताना कोपरकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.