Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

मुंबईमध्ये नाल्यात मृतदेह आढळल्याने खळबळ, खून की अपघात?

मुंबईमध्ये नाल्यात मृतदेह आढळल्याने खळबळ
, सोमवार, 28 ऑक्टोबर 2024 (09:38 IST)
मुंबईतील पवई येथील एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रविवारी ठाणे शहरातील एका नाल्यात आढळून आला. एका अधिकारींनी ही माहिती दिली असून तसेच ठाणे महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कोलशेत येथील नाल्यात एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली.
 
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी सांगितले की, स्थानिक अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला. प्राथमिक माहितीनुसार, आखाडा कोलशेत परिसरात राहणाऱ्या त्याच्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी आला होता.  
 
 तसेच मृतदेह पोस्टमोर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून कापूरबावडी पोलिसांनी सध्या अपघाती मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

छत्तीसगडमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत नक्षलवादी जखमी