न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) फरार आरोपी उन्नाथन अरुणाचलम यांच्या मुलाला मनोहरला अटक केली आहे. 122 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यातील ही चौथी अटक आहे.मनोहर अरुणाचलमला आज न्यायालयात हजर केले जाईल.
मनोहरचे वडील अरुणभाई अजून ही फरार आहे. अरुणभाई हे सोलर पॅनल कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि ते मालाडच्या मालवणी भागात राहतात. त्याने सहकारी बँकेचे जीएम हितेश मेहता यांच्याकडून 40 कोटी रुपये घेतले होते.
घोटाळा उघडकीस आल्यापासून उन्नाथन अरुणाचलम फरार झाला आहे आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग त्याचा शोध घेत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभादेवी येथील बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या तिजोरीत फक्त 10 कोटी रुपये ठेवता येतात. परंतु 11 फेब्रुवारी 2025 रोजीच्या चाचणी शिल्लक रकमेत 'कॅश-इन-हँड' 133.41 कोटी रुपये नोंदवले गेले. म्हणजे कागदावर 133 कोटी रुपये होते, पण प्रत्यक्षात खूप कमी पैसे मिळाले.
तपासादरम्यान अधिकाऱ्यांना फक्त 11.13 कोटी रुपये सापडले. यापैकी 10.53 कोटी रुपये गोरेगाव कॅश सेल तिजोरीत होते आणि 60 लाख रुपये मुख्य कार्यालयातील तिजोरीत होते. हा मोठा फरक EOW साठी एक महत्त्वाचा संकेत आहे