Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ठाण्यात महिला डॉक्टरची 30 लाख रुपयांची फसवणूक

ठाण्यात महिला डॉक्टरची 30 लाख रुपयांची फसवणूक
, शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (16:52 IST)
सध्या सायबर ठग नवीन नवीन प्रकारे लोकांची फसवणूक करून पैसे लुबाडत आहे. सुशिक्षित लोकं  देखील त्यांच्या जाळ्यात अडकून पैसे देऊन मोकळे होतात. नंतर त्यांना फसवणूक झाल्याचे समजते तो पर्यंत उशीर झाला असतो. 

ठाण्यात एका महिलेची 30 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. महिला फोन वरून एक अप्लिकेशन डाउनलोड करायला सांगितले आणि तिच्या खात्यातून वेगवेगळ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत खोणीत राहणाऱ्या एक 42 वर्षीय महिला डॉक्टरला एका व्यक्तीने क्रिप्टोकरन्सी विकत घेण्याचे आमिष दाखवून 30 लाखाहूंन अधिक रुपयांची फसवणूक केली. पीडित महिलेने तक्रारीत ही घटना 2 ते 6 ऑगस्ट दरम्यान घेतल्याचे सांगितले. 

पीडित महिलेला 24 जुलै रोजी थायलंडला पाठवणाऱ्या एका पार्सल मध्ये संशयास्पद वस्तू असल्याचा दावा करण्यात आला. एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून तिला त्या पार्सल मध्ये तीन पासपोर्ट, तीन सिमकार्ड आणि एमडी ड्रग्स असल्याचे सांगितले. 

नंतर महिलेला एक मोबाईल एप्लिकेशन डाउनलोड करून 30 लाख रुपयांहून अधिकची क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्याचे आमिष दाखवले नंतर महिलेला वेगवेगळ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायला सांगितले. नंतर पीडित महिलेला आपली फसवणूक झाल्याचे समजले. तिने कल्याण विभागातील मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 
 
Edited by - Priya Dixit   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे सह या 5 जिल्ह्यांना पावसाचा यलो अर्लट जारी