मुंबईत सुट्या दुधाच्या किमतीत प्रतिलिटर 7 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे सुटे दुध खरेदी करताना प्रतिलिटर दुधासाठी मुंबईकरांना 80 रूपये मोजावे लागणार आहेत आणि हे नवे दर 1 सप्टेंबर पासून लागू करण्यात येतील.
चाऱ्याचे दर दुपटीने वाढले आहेत. त्याचबरोबर तूर आणि हरभऱ्याच्या किमती सुद्धा 15 ते 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे सुट्या सुधाच्या किमतीत वाढ झाली आहे. असं अध्यक्ष सी. के. सिंह आणि संयोजक कासम काश्मीर यांनी सांगितले. या संदर्भात रविवारी संघाची बैठक सुद्धा झाली. ही दूध दरवाढ 1 सप्टेंबर 2022 पासून 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असेल अशी माहिती सुद्धा देण्यात आली.