मुंबई- कोरोनाच्या भयावह काळात सातत्याने निराशाजनक बातम्या कानावर येत असताना एक सकारात्मक बातमी म्हणजे मुंबईत एका 75 वर्षीय महिलेने कोविडशी यशस्वी झुंज देत मृत्यूवर मात केली आहे. आश्चर्य बाब यासाठी कारण डॉक्टरांनी त्यांची प्रकृती बघून कुटुंबीयांना कल्पना दिली होती की त्यांच्याकडे फक्त 24 तासांचा वेळ आहे.
शैलजा नाकवे या महिलेचं नाव असून त्या घाटकोपरच्या सोनाग्रा मेडिकल अँड सर्जिकल सेंटरमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्या कोरोनामुक्त झाल्यावर रुग्णालयातील स्टॉफने केक कापून त्यांचा डिस्चार्ज साजरा केला.
शैलजा यांच्यावर उपचार करणार्या डॉ. राजाराम सोनागरा यांच्याप्रमाणे त्या मधुमेहाच्य रुग्ण आहेत तसंच फुफ्फुसापर्यंत संसर्ग झाला होता. त्यांना पूर्णपणे व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. डोंबिवली येथे राहणार्या शैलजा यांनी तीन-चार दिवसांपासून ताप होतो. ऑक्सिजनचे प्रमाण घटून 69 पर्यंत पोहचले होते. कुटुंबातील लोकांनी त्यांना लगेच घाटकोपरच्या रुग्णालयात दाखल केलं. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.
येथे दाखल झाल्यावर त्यांना व्हेंटिलेटर सर्पोट लागत होता. ऑक्सिजन लेवल वाढल्यावरही श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. सीटी स्कोर 25/25 होतं तरी शैलजा यांनी दुसर्या मोठ्या सेंटवर जाण्यास नकार दिला. डॉक्टरांकडून रेमडेसिव्हीरची आणि इतर औषधं देण्यात आले.
शैलजा यांच्या मुलगा प्रशांत नकवे यांनी सांगितले की रेमडेसिव्हीरची सहा इंजेक्शनची व्यवस्था करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अशात माझ्या आईकडे केवळ 24 तास असल्याचं सांगण्यात आलं तेव्हा माझ्या मेंदूने जणू काम करणे बंद केले होते. माझी आई फायटर आहे.
प्रशांत यांनी सांगितले की 5 दिवसांनंतर तिच्या तब्येतील सुधार व्हायला सुरुवात झाली. तरी तेव्हा काही दिवस ती कृत्रिम ऑक्सिजनवर अवलंबून होती. दररोज 2 लीटर ऑक्सिजनची गरज असायची. आता पूर्णपणे बरे होण्यासाठी त्यांना 6 महीने लागतील. माझी आई म्हणते की मी मृत्यूला स्पर्श करुन परत आली आहे.