Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चांगली बातमी! डेक्कन एक्स्प्रेसचे विस्टाडोम कोचसह नवीन रूप

चांगली बातमी! डेक्कन एक्स्प्रेसचे विस्टाडोम कोचसह नवीन रूप
, रविवार, 27 जून 2021 (16:27 IST)
शनिवारी प्रथमच डेक्कन एक्स्प्रेस मुंबई ते पुणे दरम्यान व्हिस्टाडोम कोचसह चालविण्यात आली. या कोचच्या सर्व 44 जागा पहिल्याच ट्रिपमध्ये भरल्या गेल्या. प्रवासादरम्यान प्रवाशांनी आपला प्रवास मोबाईलवरच केला नाही तर सुंदर बाहेरचे दृश्य देखील बघितले.
 
शनिवारी सकाळी सात वाजता डेक्कन एक्स्प्रेस मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून रवाना झाली. प्रवास सुरू करण्यापूर्वी काही उत्साही प्रवाश्यांनी सीएसएमटी प्लॅटफॉर्मवरील कोचजवळ सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेतले. त्याचवेळी एका प्रवाशाने 'कोचच्या आत'दिसणाऱ्या सारखा एक केकही कापला.
 
 
डेक्कन एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम डबे बसवून, प्रवाश्यांना वाटेतल्या सर्व सुंदर टेकड्यांचा आणि निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता येईल. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एका व्हिडिओद्वारे या प्रवासाची झलक दिली आहे. ही गाडी दक्षिण-पूर्व घाटखंडमधील प्रसिद्ध माथेरान हिल्स, सोनगीर हिल्स, उल्हास नदी, उल्हास व्हॅली, खंडाळा आणि लोणावळा, धबधब्याच्या बोगद्यातून जाईल. यामुळे प्रवाशांना निसर्गाची आगळी वेगळी अनुभूती मिळेल.
 
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले की, वातानुकूलित कोचमध्ये काचेची छत, मोठ्या पारदर्शक खिडक्या, लक्झरी आणि आरामदायक खुर्च्या आहेत. या खुर्च्या 180 डिग्री पर्यंत फिरू शकतात, याचा अर्थ असा की आता आपल्याला शेजारी बसलेल्या प्रवाश्याशी बोलण्यासाठी मान फिरवण्याची गरज भासणार नाही. आपण खुर्ची फिरवून आरामात बोलू शकाल. त्याच वेळी, आपण कोचमध्ये स्थापित केलेल्या मोठ्या खिडक्यांतून बाहेरील दृश्य आरामात बघू शकता. 
 

व्हिस्टाडोममध्ये  काय विशेष आहे?
 
* कोच मध्ये मोठ्या काचेच्या खिडक्या बसवलेले आहेत. काचेची छत, मोठ्या पारदर्शक खिडक्या,आरामदायी खुर्च्या आहे.या खुर्च्या रोटेशनल आहेत. 
 
* डब्यात वाय-फाय-आधारित प्रवासी माहिती प्रणालीदेखील पुरविली गेली आहे. 
* खिडक्या काचेच्या शीटने लॅमिनेट केल्या आहेत. हे त्यांना तुटण्यापासून वाचवते. 
 
* कोचमध्ये एअर-स्प्रिंग सस्पेन्शन देखील आहे. ओब्जेर्व्हेशन लाऊंजमध्ये मोठी खिडकी आहे. 
 
* प्रत्येक प्रवाशाच्या सीटखाली मोबाइल चार्जिंग पॉईंट्स दिले आहेत.
 
* येथे डिजिटल डिस्प्ले आणि स्पीकरची सुविधा देखील दिली आहे. आपण आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. 
 
* डब्यात स्वयंचलित सरकणारे दरवाजे बसविण्यात आले आहेत. 
 
* जीपीएस सिस्टम, सन-इन टाइप एलईडी डेस्टिनेशन बोर्ड, स्टेनलेस स्टील मल्टी-टियर लगेज रॅक असतील.
 
* रिफ्रेशमेंटमध्ये मिनी पँट्री, मायक्रोवेव्ह ओव्हन, कॉफी मेकर, वॉटर कूलर, रेफ्रिजरेटर आणि वॉश बेसिन सुविधा देण्यात येईल. 
 
* नवीन डब्यात सुरक्षेच्या दृष्टीने ट्रेनवर नजर ठेवण्यासाठी ऑनबोर्ड सर्व्हिलॉन्स ठेवण्यासाठी सीसीटीव्ही प्रणालीसह सुसज्ज आहेत. 
 
* कोच चे आतील भागही चांगले आहे. एफआरपी मॉड्यूलर टॉयलेट्स आहेत
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध सुरु,काय सुरु आणि काय बंद असणार जाणून घ्या