Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोकल प्रवाशांना मोठा दिलासा : राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय, प्रवासासाठी आता लोकलच्या पासची गरज नाही

लोकल प्रवाशांना मोठा दिलासा : राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय, प्रवासासाठी आता लोकलच्या पासची गरज नाही
, रविवार, 31 ऑक्टोबर 2021 (12:43 IST)
मुंबई लोकल ने  प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही चांगली बातमी आहे. राज्य सरकारने लसीकरण घेतलेल्या लोकांनाच मासिक पास देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे खूप गोंधळ झाला होता लोकांना या निर्णयामुळे त्रास होत होता. पास मिळविण्यासाठी भली मोठी रांग लागायची आणि लोकांची नाराजी होती. पण आता लोकलने प्रवास करणाऱ्याना आणि लसीकरण पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्यांना आता लोकलचे तिकीट मिळणार. या पूर्वी लसीकरण पूर्ण झालेल्यांना केवळ मासिक पास देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. काही तासांच्या प्रवासासाठी लोकांना मासिक पासच खरेदी करावा लागत होता. लोकांच्या खिशाला ते परवडत नसे. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी होती. रेल्वेने लोकांना होणाऱ्या या त्रासाबाबत राज्य सरकारला हे सांगितले. यावर राज्यसरकारने निर्णय घेत रेल्वेला पत्र लिहिले आहे आणि त्या पत्रात पूर्ण लसीकरण झालेल्या अत्यावश्यक सेवेत असलेले किंवा नसलेले अशा लोकांना एक दिवसाचे तिकीटच देण्याचे सांगण्यात आले आहे. या शिवाय कोव्हिडच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. रेल्वेचे अतिरिक्त कर्मचारी स्थानकावर ठेवावे. पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांनाच तिकीट दिले जावे आणि या साठी त्याची पडताळणी करण्याचे निर्देश देखील राज्य सरकारने पत्रात दिले आहे. या निर्णयामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या लोकांना दिलासा मिळणार आहे.        
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Accident in Uttarakhand: उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना : चकराता मध्ये वाहन दरीत कोसळले , 13 जणांचा मृत्यू, मदत आणि बचाव कार्य सुरू