Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संपूर्ण मुंबईत व्हायरल झाला आहे का? नेमके काय आहे जाणून घ्या

संपूर्ण मुंबईत व्हायरल झाला आहे का? नेमके काय आहे जाणून घ्या
, सोमवार, 10 जानेवारी 2022 (17:18 IST)
सध्या राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉन चे संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज 40 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण समोर येत आहेत. यापैकी 20 हजारांहून अधिक प्रकरणे केवळ मुंबईतून येणारी आहेत. रविवारी राज्यात ओमिक्रॉनचे 207 नवीन रुग्ण आढळले. दरम्यान, राज्यातील हवामानात होणारे झपाट्याचे बदल मुळे देखील लोक आजारी पडत आहेत.
सध्या  मुंबईत सर्दी, खोकला, तापाची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. 
आणि  कोरोना आणि ओमिक्रॉनची लक्षणे देखील या सारखीच आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बहुतांश लोकांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत.अशा स्थितीत मुंबईकर विचारात पडले आहेत की,  हा  त्यांचा ताप व्हायरलचा आहे किंवा त्यांनी कोरोना चाचणी करावी.
तज्ज्ञांच्या मते, पहिल्या आणि दुसऱ्या लहरीच्या तुलनेत तिसऱ्या लहरीमध्ये श्वसनसंस्थेची सर्वाधिक काळजी घेण्याची गरज आहे. म्हणजेच नाक, कान, घसा यांची काळजी घेण्याची गरज आहे. तिसऱ्या लहरीमध्ये घसा खवखवणे, नाक वाहणे, नाक सुजणे ही लक्षणे सर्वाधिक दिसून येत आहेत. थंडीमुळे देखील ही लक्षणे असू शकतात. कारण काहीही असो, पण सध्या प्रत्येकाने वरील लक्षणांची काळजी घेण्याची नितांत आवश्यकता आहे. अशी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना त्वरित दाखवा. घरगुती काढे किंवा उपचार करू नका. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोना झाला, स्वतःला घरी क्वारंटाइन केले