मुंबईची लोकलसमोर आत्महत्या करण्यासाठी एका तरुणाने धावत्या रेल्वेसमोर उडी मारली पण वेळीच पोलीस कर्मचाऱ्याने धाव घेऊन या तरुणाचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्याच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
ही घटना विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनवर बुधवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. एक तरुण बऱ्याच वेळ स्टेशनवर उभा होता. नंतर समोरून मेल एक्स्प्रेस येत असल्याचं बघून त्याने रुळावर उडी घेतली. तरुण रुळावर आधी खाली बसला नंतर उभा राहिला. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्याने हे बघताच क्षणाचा ही विलंब न करता थेट रुळावर उडी घेतली. या तरुणाला पकडून रुळावरून बाजूला झेप घेतली आणि तरुणाचे प्राण वाचवले.