Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हॉटेल-रेस्टॉरंट आणि बारमधील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणं बंधनकारक

हॉटेल-रेस्टॉरंट आणि बारमधील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणं बंधनकारक
, बुधवार, 24 मार्च 2021 (10:07 IST)
कल्याण-डोंबिवलीतील आता हॉटेल-रेस्टॉरंट आणि बारमधील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणं बंधनकारक करण्यात आले आहे. महानगरपालिकेनेच तसे आदेश दिले आहेत. निर्बंधांमध्ये शिथिलता मिळू लागल्याने कल्याण-डोंबिवलीत रस्त्यांवर तसंच हॉटेल-रेस्टॉरंटमध्येही मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळेच अशा ठिकाणाहून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच आता बार, हॉटेल्स-रेस्टॉरंटमध्ये कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करणं सक्तीची करण्यात आले आहे. 
 
पुढील ७ दिवसांच्या आत कर्मचाऱ्यांना स्वत: खर्च करूनच कोरोना चाचणी करायची आहे. तसेच त्याचा अहवाल [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवायचा आहे. केडीएमसीच्या सर्व प्रभाग क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात हॉटेल्स-रेस्टॉरंट आणि बारमध्ये भेट देऊन याबाबत खातरजमा करण्यासही सांगण्यात आले आहे. जे या आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा इशाराही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बहुमत आहे, तोपर्यंत तुम्ही आमच्या केसालादेखील धक्का लावू शकत नाही : संजय राऊत