Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रात आता व्हीआयपी क्रमांक 9999'साठी मिळवण्यासाठी मोजावे लागणार एवढे पैसे

Fancy Number
, सोमवार, 2 सप्टेंबर 2024 (11:01 IST)
भारतात वाहन खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. वाहनांसाठी लोक आपल्या आवडीचे वाहन नंबर मिळवतात. या साठी ते कितीही पैसे मोजतात.मात्र आता महाराष्ट्रात आवडीचे वाहन नंबर मिळवण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. शिंदे सरकारने नवीन वाहनांसाठी फेव्हरेट नंबरच्या शुल्कात बदल केला आहे.

आता राज्यात 0001 क्रमांकाचे शुल्क 4 लाखांवरून 6 लाख रुपये करण्यात आले आहे. तर आउट ऑफ सिरीज व्हीआयपी नंबरची किंमत आता 18 लाख रुपये करण्यात आली आहे. 

या संदर्भात परिवहन विभागाने 30 ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली आहे. या मध्ये व्हीआयपी क्रमांकाची मागणी सर्वाधिक पुणे, रायगड, रौगड, नाशिक,कोल्हापूर आणि औरंगाबाद या शहरांमध्ये असल्याचे नमूद केले आहे.चारचाकी वाहनांसाठी आवडता क्रमांक 0001 चे शुल्क सध्या 3 लाख रुपयांवरून 5 लाख करण्यात आले आहे.

तर दुचाकी आणि तीन चाकी वाहनांचे शुल्क 50 हजारांवरून 1 लाख रुपयांपर्यंत दुपटीने वाढवले आहे. तर 0001 हे विशेष क्रमांक मिळवण्यासाठी व्हीआयपी शुल्क 4 लाख रुपयांवरून 6 लाख रुपये करण्यात आला आहे. 
राज्य सरकार ने पत्नी, मुले आणि मुलींसह कुटुंबातील सदस्यांसाठी व्हीआयपी क्रमांक हस्तांतरित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

राज्यात 0001 अतिरिक्त 0009, 0099, 0999, 9999 आणि 0786 या क्रमांकासाठी परिवहन विभागाने वेगवेगळे शुल्क निर्धारित केले आहे. चारचाकी आणि त्यावरील वाहनांचे शुल्क दीड लाखांवरून अडीच लाख केले आहे. तर दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी 20 हजार रुपयांऐवजी 50 हजार केले आहे. 
Edited by - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतीय पॅरा ॲथलीट प्रीती पालने महिलांच्या 200 मीटरमध्ये कांस्यपदक पटकावले