Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राणीच्या बागेत जायचं मग करा ऑनलाइन’ बुकिंग

ranicha bagh
, शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (14:22 IST)
मुंबईतील खास पर्यटन स्थळांपैकी एक व बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण असलेल्या भायखळा येथील राणी बागेत (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय) आता भर उन्हात रांग न लावता ऑफिस अथवा घरबसल्या ‘ऑनलाइन’ तिकीट काढून आरामात सहकुटुंब जाऊन प्राणी सफरीचा आनंद लुटू शकता. त्यामुळे मुंबईकरांची वेळेची बचत होणार असून पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 
 
मुंबई महापालिका प्रशासनाने भायखळा येथील राणी बागेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने शुक्रवारी ‘ऑनलाइन’ तिकिट नोंदणी प्रणाली सुरु केली. या प्रणालीचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ.संजीव कुमार यांच्या हस्ते राणी बागेतील थ्रीडी प्रेक्षागृहात करण्यात आला.
 
यावेळी उपआयुक्‍त (उद्याने) किशोर गांधी, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आणि इतर मान्‍यवर यावेळी उपस्थित होते.
 
पालिकेने ऑनलाईन तिकिट यंत्रणा कार्यान्वित केल्यामुळे आता घरबसल्या अथवा ऑफिसमधूनही राणी बागेची तिकीट काढणे शक्य होणार आहे. या ऑनलाईन तिकिट प्रणालीचे शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांच्या हस्ते लोकार्पण करण्‍यात आले. त्‍यादृष्‍टीने पर्यटकांना अवगत करण्‍यासाठी परिसरात सर्वत्र क्यू आर कोडही प्रदर्शित करण्‍यात आले आहेत. https://themumbaizoo-ticket.mcgm.gov.in/ या लिंकचा उपयोग करुन बृहन्मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर पर्यटकांना ही तिकिट नोंदणी करता येईल.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

FIFA वर्ल्डकप 2022 : कतारमध्ये होणारा विश्वचषक 'या' 7 कारणांमुळे ठरणार लक्षवेधी