Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवाजी महाराज पार्कसाठी नाशिक महापालिकेसारखेच सीएसआरचे मॉडेल राबवा

शिवाजी महाराज पार्कसाठी नाशिक महापालिकेसारखेच सीएसआरचे मॉडेल राबवा
, गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (15:37 IST)
मुंबईतील दादरच्या शिवाजी महाराज पार्क मैदानाला देखभालीसाठी दररोज हजारो लिटर पाणी लागते. महापालिकेचे या मैदानाकडे गेल्या काही वर्षांमध्ये दुर्लक्ष झाले आहे. पण महापालिका आता ४ कोटी रूपये खर्च करून याठिकाणी जलसंचयनाचा प्रकल्प सुरू करत असल्याकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे. महापालिकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता याठिकाणी नाशिक महापालिकेसारखेच सीएसआरचे मॉडेल राबवावे अशी विनंती राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना एका पत्राच्या माध्यमातून केली आहे. नाशिकच्याच धर्तीवर शिवाजी पार्कातही सीएसआरचे मॉडेल राबवावे असे राज ठाकरे यांनी सुचवले आहे. सध्या या प्रकल्पाच्या निमित्ताने सुरू असणारी निविदा प्रक्रिया थांबवावी असेही राज ठाकरे यांनी विनंती केली आहे.
 
मुंबई महापालिकेला शिवतीर्थाची देखभाल करण्यासाठी दररोज हजारो लिटर पाणी लागते. महापालिकेच्या पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा याअनुषंगानेच जलसंचयनाचा प्रकल्प हा मनसेच्या नगरसेवकाने सुरू केला होता. माझे नगरसेवक होते तोवर हा प्रकल्प व्यवस्थित सुरू होता. त्यामुळेच मुंबई महापालिकेच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत होती. २०१७ नंतर मात्र हा प्रकल्प बंद झाला, किंबहुना दुर्लक्षित झाला. मुंबई महापालिका हा जलसंचयनाचा प्रकल्प पुन्हा सुरू करत असल्याचे महापालिकेचे जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत सांगितल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाला ४ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संभाजी भिडे यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तोंडावर लावलेला मास्क काढायला लावला