Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवी मुंबईत प्रेमप्रकरणातून एका युवकाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या

नवी मुंबईत प्रेमप्रकरणातून एका युवकाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या
, गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (07:40 IST)
नवी मुंबईत प्रेमप्रकरणातून एका युवकाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. अनिकेत नामक मुलगा नवी मुंबईतील तळवली भागामध्ये राहत होता. या दरम्यान अनिकेतची एका मुलीशी ओळख झाली होती. त्यांच्यात बोलणं देखील सुरु झालं. मात्र मध्यंतरी कोरोना आला आणि अनिकेत आपल्या घरी नाशिकला राहायला गेला. 
 
या काळात अनिकेतच्या ओळखीच्या अनिल शिंदे याची त्याच मैत्रिणीशी ओळख झाली. लॉकडाऊनच्या काळात अनिलची अनिकेतच्या मैत्रिणीशी ओळख वाढत होती. दोघांमधील जवळीक वाढत होती. अनिल आणि त्या मैत्रिणीची वाढलेली जवळीक अनिकेतला खटकत होती.शेवटची राग अनावर न झाल्याने अनिकेतने टोकाचं पाऊल उचललं आणि अनिलचा थंड डोक्याने कोयत्याने हल्ला करत खून केलाय. 
 
बेपत्ता तरुणाचा शोध घेताना हत्येचा सुगावा
 
नवी मुंबईतील तळवली परिसरात राहणारा 19 वर्षांचा अनिल शिंदे पाच फेब्रुवारीला सकाळी बेपत्ता झाला होता. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी त्याच्या फोनवरील शेवटचे लोकेशन शोधलं असता नाशकातील तरुणाची माहिती समोर आली.
 
पोलिसांनी 19 वर्षांच्या अनिकेत जाधवला नाशिकमधून ताब्यात घेतले. चौकशीसाठी त्याला पोलिस ठाण्यात आणले असता, त्याने अनिलची हत्या केल्याची कबुली दिली. त्याने दाखवलेल्या घटनास्थळावरुन अनिलचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला.
 
घणसोली गावालगतच्या झाडीत हा मृतदेह टाकला होता. चार दिवसांपासून अनिलचा मृतदेह पडून होता. अनिकेतची मदत करणाऱ्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डॉन अरुण गवळीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह