मुंबईमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कबूतरखान्याचा विषय चांगलाच पेटला आहे. आंदोलनादरम्यान काही कबुतरांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या आत्मशांतीसाठी जैनसमाजाने आता राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला असून, जैन मुनी नीलेशचंद्र यांनी 'शांतिदूत जनकल्याण पार्टी' या नव्या पक्षाची अधिकृत घोषणा केली .कबुतर" हे त्यांचे निवडणूक चिन्ह घोषित करून सरकारला उघड आव्हान दिले आहे.
जैन मुनी नीलेश चंद्र विजय म्हणाले, "हा केवळ जैन समुदायाकडून सरकारला इशारा नाही तर सनातन धर्माकडून आहे." त्यांनी दावा केला की जैन समुदाय महाराष्ट्र सरकारला सर्वाधिक कर देतो, त्यामुळे त्यांच्या आवाजाकडे आता दुर्लक्ष केले जाणार नाही. पक्षाचे निवडणूक चिन्ह कबुतर आहे. मुनीनी सांगितले की हा पक्ष केवळ जैनांचाच नाही तर गुजराती आणि मारवाडी समुदायांचाही आवाज असेल.
कबुतरखाना बंद पडल्याने मृत्युमुखी पडलेल्या कबुतरांना जैन मुनीनी श्रद्धांजली वाहिली तेव्हा सभेतील वातावरण भावनिक झाले. निलेश मुनी व्यासपीठावरून म्हणाले, “कांद्यामुळे काँग्रेसचे सरकार पडले, कोंबड्यांमुळे शिवसेनेचे सरकार पडले. आता कबुतरांमुळे कोण पडेल? विचार करा!” त्यांचे विधान थेट महायुती सरकारचा संदर्भ देत असल्याचे दिसून आले.