मुंबईच्या वाकोल्यामध्ये बंदुकीचा धाक ज्वेलर्सला लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाकोला पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. वाकोल्यात ज्वेलर्सला बंदुकीचा धाक दाखवत सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
मुंबईतील वाकोला परिसरात बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्सच्या घरातून तब्बल दोन किलो 232 ग्रॅम सोन्याचे आणि 385 ग्राम चांदीचे दागिने लंपास केले. या सोने-चांदीची किंमत एक कोटी 42 लाख रुपये इतकी आहे.
आरोपींनी बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्सच्या घरातून तब्बल दोन किलो 232 ग्रॅम सोन्याचे आणि 385 ग्राम चांदीचे दागिने लंपास केले. या सोने-चांदीची किंमत एक कोटी 42 लाख रुपये इतकी आहे. वाकोला पोलिसांच्या तपास पथकाने पाचही आरोपींना पालघर जिल्ह्यातील सफाळे परिसरातून अटक करून चोरीस गेलेला शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नोकरच निघाला चोर
या प्रकरणातील एक आरोपी हा ज्वेलर्सच्या दुकानात पाच वर्षांपूर्वी कामाला होता. मात्र त्याने आपल्या इतर चार साथीदारांच्या मदतीने ज्वेलर्सच्या घरात बंदुकीचा धाक दाखवून 19 तारखेला दागिन्यांची चोरी केली. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.सध्या हे पाचही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.
Edited By - Ratnadeep ranshoor