लॉकडाऊनवरुन राज्य सरकारमध्ये थोडेसे मतभेद आहे. मात्र कोरोनाच्या परिस्थितीत आम्ही पूर्ण ताकदीने मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबईत महापालिकेत बैठक घेतली. या बैठकीत येत्या आठवडाभरात नवी मुंबईकरांसाठी दोन नव्या कोरोना टेस्ट लॅब सुरु करणार असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. त्यासोबत ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर, औषध पुरवठा वाढवण्याचे आदेशही पालिका प्रशासनाला दिले. त्यावेळी त्यांनी राज्यातील नाराजी नाट्यावर आपलं मत प्रदर्शित केलं.
नवी मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7 हजारांच्या वर गेली आहे. नवी मुंबईत दररोज 150 ते 200 रुग्ण वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ज्या उपाययोजना लागतील त्या त्वरीत उभा करण्याचे आदेश मनपा आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांना देण्यात आले आहेत. नवी मुंबईत कोरोना संख्या वाढत आहे. तर कोरोना टेस्ट लॅब अद्याप सुरु होत नसल्याने नवी मुंबईकरांमध्ये नाराजी आहे.