मुंबईतील वांद्रा येथील कराची बेकरी बंद केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाकिस्तानी नावाला विरोध करत कराची बेकरीला नाव बदलण्याचा इशारा दिला होता. कराची बेकरी चे नाव नाव बदलण्याची मागणी मनसेचे उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी केली होती. त्यांनी याबद्दल ट्विट केले आहे.
नितीन नांदगावकर यांनी मनसेमध्ये असताना कराची बेकरी या नावाला विरोध केला होता तेव्हा मनसेचे हाजी सैफ शेख यांनीही वांद्रे येथील कराची बेकरीसमोर गोंधळ घालत दुकानमालकाकडे दुकानाचं नाव बदलण्याची मागणी केली होती. दरम्यान, हाजी सैफ शेख यांनी कराची बेकरीनं मुंबईतील दुकानं बंद केल्याची माहिती दिली.
“नाव बदलण्यासाठी कराची बेकरीसमोर तीव्र आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर अखेर मुंबईतील कराची बेकरी हे दुकानं बंद करण्यात आलं आहे.” असं शेख यांनी म्हटलं आहे. शेख यांनी ही पोस्ट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डललाही टॅग केली आहे.
मात्र सूत्रांप्रमाणे बेकरी मनसेच्या इशाऱ्यामुळे बंद झाली नसून बेकरीचे व्यवस्थापक यांच्याप्रमाणे "दुकानाचा भाडे करार संपल्यानं तसंच ते परवडत नसल्यामुळे दुकान बंद केलं गेलं. तसेच लॉकडाऊन दरम्यान आर्थिक तोटा वाढला असून जास्तीचं भाडं देणं शक्य नसल्यामुळे बेकरी बंद करण्यात आली."